Sold out!
,

Untitled Drawing

6,000

Artist: Ganesh Tartare

Title: Untitled -2
Category: Abstract art
Media: Charcoal on Paper
Height: 8 inches, Width: 5 inches
Year: 2019

BUY TODAY: ENQUIRE NOW

TAXES: All artwork sold within India are subject to 12% GST.

SHIPPING
Each Artworks is original; it is carefully packed, either flat or rolled in a tube, We ship our paintings worldwide. and is accompanied by a certificate of authenticity.
All image copyright Nippon

माझ्यासाठी कलानिर्मितीती ही कला ही केवळ दृश्य किंवा अभिव्यक्ती नाही, ती जसा माझ्या आत्मशोधाचा प्रवास आहे.तसाच तो माझ्या सर्जनशीलतेचा ही प्रवास आहे. कलेची पहिली ओळख झाली ती लहानपणी मठातल्या एका भारलेल्या क्षणी. जिथे मंदिराचा घंटा नाद ही एका अज्ञात विश्वाची ओळख करून देत होता. पुढे कळत्या वयात पुस्तकांशी मैत्री झाल्यावर अधिक लक्ष वेधले ते पुस्तकातील चित्रांनी.. कला शिक्षणातून या सगळ्याच प्रवासाचा स्वतःलाच साक्षात्कार व्हावा, अशा वळणावर, अमूर्ताच्या प्रवासात जे माझे मूळ अधिष्ठान होते तेच शिवतत्त्व मला प्रेरणा म्हणून भेटले.. हळूहळू लक्षात आले की मानवी जीवन. कला आणि भवताल हे सगळेच मायेतूनच उभे राहिले आहे.फरक असलाच तर तो इतकाच की, प्रत्येक सर्जक आपले साध्य,आणि आराध्य आपल्या जगण्यातूनच घेत असतो.माझ्यातल्या सर्जकाला ते माझ्या संस्कारातून,माझ्या जैविक परंपरेतून मिळाले असावे. .. मी आजवर जे काही अभिव्यक्त करत आलो आहे, ते नेमके काय आहे हे नीट उमजायला एक मोठा कालखंड गेला असला तरी त्याचे दृश्य आणि चेतवणारे, प्रज्वलित करणारे रूप मात्र माझ्या नेहमीच्या अध्यात्मातून अनुभवत होतो… एका वळणावर या रुद्रतत्वाची खात्री पटली.. माझा सर्जन प्रवास खऱ्या अर्थाने तिथून सुरू झाला . आज“रुद्रतत्त्व” ही संकल्पना माझ्या निर्मितीच्या केंद्रस्थानी आहे.

कला कशासाठी हा सगळ्यांनाच पडणारा प्रश्न. माझ्यासाठी ती मुक्ती आहे.. स्वतःपासून, भवताल आणि आत दडलेल्या आकांक्षा पासून… त्यामुळे जेव्हा जेव्हा मी काही निर्मिती करतो.. तो क्षण मला माझ्यातून पुन्हापुन्हा सोडवतो. निराकार बनवतो.आणि मुक्तीसाठीच्या या सर्जनाकडे घेऊन जातो.

अमूर्त अभिव्यक्तीच्या माध्यमातून मी या रुद्रतत्त्व साकार करताना रंग, रेषा आणि गती यांचा जो काहीसा नेहमीच्या परिचित पठडी टाळून थोडाफार वेगळ्या प्रकारे विचार केला आहे. .. तोही अर्थातच एका विशिष्ट अनुभूतीतून .तिथे माझा स्वतःचा हस्तक्षेप नाही. निसर्ग वृत्तीच ते आपल्याकडून करून घेत असते. त्यामुळेच माझ्या चित्रांमध्ये काळा आणि पिवळा रंग हे दोन टोकांचे संवाद आहेत. यातला काळा रंग गूढता, शक्ती आणि अज्ञाततेचे प्रतिनिधित्व करतो, तर पिवळा प्रकाश, उर्जा आणि परिवर्तनाचे. या दोन शक्तींमध्ये असलेले साहचर्यच रुद्रतत्त्व आहे.जे संहार आणि सर्जनाचाच एक अविभाज्य भाग आहे.

या सर्जनशील प्रक्रियेत मला अनेक गोष्टींनी प्रेरित केले आहे, त्यात शैव तत्त्व, भारतीय तांत्रिक परंपरा, भारतीय कलेचा इतिहास.. अध्यात्म,आस्था, अमूर्तकलेतील पूर्वसूरींनी शोधलेला आणि सोडून दिलेला एक मोठा विस्तीर्ण प्रदेश.

ही प्रदर्शने एका वेळी दोन ठिकाणी आणि दोन वेगवेगळ्या माध्यमांतून रसिकांसमोर येत आहेत. ही दृश्ययात्रा अनुभवणाऱ्या प्रत्येक प्रेक्षकाने त्याच्या स्वतःच्या जाणिवांचा, अनुभवांचा आणि ऊर्जेच्या संप्रेषणाचा शोध घ्यावा, माझ्या अनुभूतीशी संवाद साधावा. हीच इच्छा.

गणेश तरतरे
*

For me, art is not just a visual or expressive medium, it is a journey of self-discovery. Similarly, it is a journey of my creativity. I was first introduced to art in a charged moment in my childhood in a monastery. Where the sound of the temple bell introduced me to an unknown world. Later, when I became friends with books at an early age, the pictures in the book caught my attention more.. Through art education, I wanted to realize this journey for myself. At such a juncture, the Shiva principle, which was my original foundation in the journey of abstraction, met me as an inspiration.. Gradually, I realized that human life. Art and the environment have all arisen from Maya. The only difference is that every creator takes his achievement and worship from his own life. The creator in me must have received it from my culture, from my biological tradition. .. Although it has taken a long time to fully understand what exactly I have been expressing so far, I was experiencing its visual and stimulating, illuminating form through my usual spirituality… At one point, I became convinced of this Rudratattva.. My creative journey truly began from there. Today, the concept of “Rudratattva” is at the center of my creation.

What is art for? This is a question that everyone faces. For me, it is liberation.. from myself, from the environment and from the aspirations hidden within… Therefore, whenever I create something.. that moment releases me from myself again and again. Makes me formless. And takes me to this creative path for liberation.

While realizing this Rudratattva through abstract expression, I have thought about color, line and speed in a slightly different way, avoiding the usual familiar patterns. .. That too, of course, from a specific feeling. There is no interference of my own. Nature itself does it for us. That is why in my paintings, black and yellow are a dialogue of two extremes. Black represents mystery, power and the unknown, while yellow represents light, energy and transformation. The association between these two forces is the Rudratattva, which is an inseparable part of destruction and creation.

In this creative process, I have been inspired by many things, including Shaivism, Indian Tantric tradition, the history of Indian art.. spirituality, faith, a vast territory discovered and abandoned by the predecessors of abstract art.

These exhibitions are coming to the audience at two places at a time and through two different media. Every viewer who experiences this visual journey should explore their own perceptions, experiences and communication of energy, and communicate with my feelings. This is my wish.

– Ganesh Tartare

Color

Black, Pink, Red, Yellow

Medium

Acrylic, Gesso, Ink, Watercolor

Size

Small

Subject

Abstract, Animal, Floral, Landscape, People, Portrait

Shopping Cart
Scroll to Top